कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती
कार्यालय) :- क्रीडा मंत्रालय नवी दिल्ली यांच्या
मार्फत दिल्या जाणाऱ्या सन 2019 साठीच्या ध्यानचंद जीवन गौरव, राजीव गांधी खेलरत्न
पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोनाचार्य पुरस्कारासाठी दिनांक 26 मे पर्यंत विहीत
नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे
यांनी केले आहे.
या पुरस्कारासाठी जिल्ह्यातील खेळाडूंनी संचालक क्रीडा युवक
सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती क्रीडापीठ बालेवाडी-45 येथे विहीत
नमुन्यातील अर्ज दिनांक 26 मे पर्यंत सादर करावेत. केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर
करण्याची अंतिम तारीख 3 जून असून अधिक माहिती www.yes.nic.in
या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही श्री. साखरे यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.