** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, May 23, 2020

आजअखेर 30 हजार 849 मजूर कोल्हापुरातून रवाना आज झारखंड व ओडीसाकडे 1 हजार 143 मजूर रवाना



 
            कोल्हापूर, दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय) : आजअखेर एकूण 23 रेल्वेमधून 30 हजार 849 मजूर जिल्ह्यामधून मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व ओडीसाकडे रवाना झाले आहेत.
             ‘भारत माता की जय!’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले झारखंडमधील बोकारो व ओडीसाकडे आज दुपारी 1 वाजता 1 हजार 143 मजूर श्रमिक विशेष रेल्वेने रवाना झाले.
            झारखंडमधील बोकारो व ओडीसाकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये करवीरमधील 256, कागलमधील 44, गगनबावडामधील 6, शिरोळमधील 21,  हातकणंगलेमधील 330, गडहिंग्लजमधील 8, चंदगडमधील 113,  इचलकरंजीमधील 193, पन्हाळामधील 45, शाहूवाडीमधील 6, भुदरगडमधील 7, राधानगरीमधील 6 व कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील 108  असे एकूण 1 हजार 143 मजुरांचा यामध्ये समावेश आहे.
                                   
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.