** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, May 15, 2020

‘भारत माता की जय! वंदे मातरम्’ घोषणा देत 824 मजूर उत्तरप्रदेशकडे रवाना








कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय) : ‘भारत माता की जय! वंदे मातरम्’ अशा घोषणा देत लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले उत्तरप्रदेशमधील 824 मजूर आज दुपारी 1 वा. श्रमिक विशेष रेल्वेने उत्तरप्रदेशमधील बलियाकडे रवाना झाले.
            इचरलकरंजीमधील 680, गडहिंग्लजमधील 131 आणि हातकणंगलेमधील 13 अशा 824 जणांचा यात समावेश आहे. या सर्वांना 2 दिवसांच्या जेवणाची तसेच नाश्ता आणि पाणी याचे किट वाटप करण्यात आले.  यावेळी पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, संजय पवार-वाईकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, प्राचार्य डॉ. महादेव नरके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.