** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, May 11, 2020

विधानपरिषद निवडणुक : ई-पासची सोय -जिल्हाधिकारी दौलत देसाई





       कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय)  : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या व्दिवार्षिक निवडणुकीकरिता जिल्ह्यातून इच्छूक असलेल्या कोणत्याही व्यक्तींना तसेच जिल्ह्यातील विधानसभा सदस्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईला जाण्यासाठी ई-पास उपलब्ध करून देण्याची सुविधा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
       महाराष्ट्र विधानपरिषदेची व्दिवार्षिक निवडणूक 1 मे 2020 रोजी जाहीर झाली असून या निवडणुकीकरिता राज्यातील सर्व विधानसभा सदस्य मतदान करणार आहेत. सध्या राज्यात कोरोनाची साथ असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील या निवडणुकीकरिता इच्छूक असलेल्या कोणत्याही व्यक्तीला निवडणूक कार्यालय विधानभवन मुंबई येथे पोहचण्यासाठी ई-पास देण्याची सूचना  सचिव महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालय व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी केली आहे.
          तरी जिल्ह्यातील विधानसभा सदस्य आणि इच्छूक व्यक्तींनी ई-पाससाठी
http://covid19.mhpolice.in या वेबसाईटवर अर्ज करून आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत जेणेकरून महाराष्ट्र विधानपरिषदेच्या व्दिवार्षिक निवडणुकीकरिता ई-पास उपलब्ध करून देण्यात येईल, असेही श्री. देसाई यांनी कळविले आहे.
000000









No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.