कोल्हापूर,
दि. 31 (जिल्हा
माहिती कार्यालय)
:-
जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त आज आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ घेण्यात आली.
तंबाखू तसेच तंबाखुजन्य पदार्थ नियंत्रण कायदा 2003 तसेच E-
cigarette बंदीबाबतच्या अध्यादेशाची प्रभावी अमंलबजावणी करण्याकरिता आज शपथ
घेण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या शपथ कार्यक्रमास जिल्हाधिकारी
दौलत देसाई यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा
आप्पती व्यवस्थापनाचे समन्वयक संजय शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.
बी.सी.केंम्पीपाटील, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, निवासी
वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, जिल्हा परिषदेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फारुक
देसाई यांच्यासह सीपीआर हॉस्पिटल व राजर्षि शाहु महाराज शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाच्या क्षयरोग व उरोरोग विभाग प्रमुख डॉ. अनिता सायबन्नावार, औषध
वैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. एम.व्ही.बनसोडे, बालरोग विभाग प्रमुख डॉ. सुधीर
सरवदे, मेडिसिन असोसिएट प्रोफेसर डॉ. अनिता परितेकर, समुपदेशक चारुशिला कणसे
यांच्यासह सर्व संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
00000

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.