** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 26, 2020

768 अहवाल निगेटिव्ह; एकही पॉझिटिव्ह नाही -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 26 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजता 788 प्राप्त अहवालापैकी 768 अहवाल निगेटिव्ह (सिंधुदुर्गचे 20 अहवाल निगेटिव्ह) तर आज सकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण 378 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 32, भुदरगड- 49, चंदगड- 25, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 6, हातकणंगले- 4, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 119, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 373 आणि पुणे -1,  सोलापूर-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 378 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.