कोल्हापूर,दि.
28 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 402 रूग्णांपैकी 42 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. आज सकाळी 10 वाजता 67 प्राप्त अहवालापैकी 66 अहवाल निगेटिव्ह (402 पैकी यापूर्वीच्या
एकाचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आहे, असे मिळून एकूण 67) तर आज सकाळपर्यंत एकही
अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण 356 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 32, भुदरगड- 51, चंदगड- 25,
गडहिंग्लज- 16, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी-
48, शाहूवाडी- 135, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका
क्षेत्र-20 असे एकूण 396 आणि पुणे -1, सोलापूर-2, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर
जिल्हा व राज्यातील पाच असे मिळून एकूण 402 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 402 रूग्णांपैकी 42
रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 4 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील
रूग्णांची संख्या 356 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.