कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील 6 निवारागृहांमध्ये राज्यातील 55 आणि
परराज्यातील 31 अशा एकूण 86 जणांची सोय करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत
देसाई यांनी दिली.
कोल्हापूर महानगरपालिका
क्षेत्रात शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ येथे राज्यातील 16 परराज्यातील 6 अशा 22 जणांचा समावेश असून
याची क्षमता 50 जणांची आहे.
करवीर
- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे परराज्यातील 5 एकूण 5 जण
असून क्षमता 70 जणांची आहे. डी. फार्मसी कॉलेज उजळाईवाडी येथे राज्यातील 3 परराज्यातील
10 असे एकूण 13 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.
हातकणंगले
- शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी येथे राज्यातील 21 परराज्यातील 10 एकूण 31 जण असून
क्षमता 55 जणांची आहे.
शिरोळ- शाळा
क्रमांक 1 जयसिंगपूर येथे राज्यातील 12 असे एकूण 12 क्षमता 50 आहे.
गगनबावडा- समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह गगनबावडा येथे राज्यातील 3
असे एकूण 3 असून क्षमता 105 जणांची आहे.
यामध्ये कर्नाटकातील 10,
तामिळनाडूमधील 11,
राजस्थानमधील 2,
केरळमधील 3,
आंध्रप्रदेश 2,
झारखंड 4,
बिहार 1 अशा एकूण 7 राज्यातील 31
जणांचा तसेच महाराष्ट्रातील 55 असे मिळून 86 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण
करण्यात आले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.