** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, May 23, 2020

जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 89 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील




कोल्हापूर,दि. 23 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सायंकाळी 5 वाजता 829 प्राप्त अहवालापैकी 17 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 811 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 1 नाकारण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 278 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 89 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज दिवसभरात आलेल्या 17 पॉझीटिव्ह अहवालामध्ये, आजरा-2, भुदरगड-8, शाहूवाडी-7 असा समावेश आहे.
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 15, भुदरगड- 32, चंदगड- 18, गडहिंग्लज- 13, गगनबावडा- 5, हातकणंगले- 3, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 15, राधानगरी- 42, शाहूवाडी- 89, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16 असे एकूण 274 आणि पुणे -1,  कर्नाटक-२ आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 278 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
0 0 0 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.