** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, May 10, 2020

गृह अलगीकरणाचा शिक्का असणाऱ्या व्यक्तींना हमीपत्र बंधनकारक ग्राम,प्रभाग समितीच्या खात्रीनंतर गृह अलगीकरणात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे निर्देश




       कोल्हापूर, दि. 10 (जि.मा.का):- कोव्हिड रुग्णालयातून गृह अलगीकरणाचा शिक्का मारलेल्या व्यक्ती व गावात स्वतंत्र घर किंवा खोली किंवा वस्तीवर स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असणाऱ्या व्यक्ती (प्रतिज्ञापत्र, हमी पत्र घेणे बंधनकारक) (ग्राम, प्रभाग समितीने खात्री करण्याच्या अटीवर) गृह अलगीकरणात राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सर्व ग्राम तसेच प्रभाग समित्यांना आज दिले.
       आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महसूल व वन विभाग यांच्या 30 एप्रिल रोजीच्या आदेशानुसार लॉकडाऊन दरम्यान स्थलांतरित कामगार, यात्रेकरु, पर्यटक, विद्यार्थी व  वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या इतर व्यक्ती यांना शासन आदेशातील नियमांचे पालन करुन त्यांना त्यांच्या मुळ गावी पाठविण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. याला अनुसरुन जिल्ह्याबाहेरुन कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना अलगीकरण करण्याबाबतची कार्यपध्दती निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. याबैठकीला मुख्य कार्यकारी अमन मित्तल, छत्रपती शाहू शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.बी.सी. केम्पीपाटील उपस्थित होते.
            याबैठकीत ठरलेल्या कार्यपध्दती बाबत जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी सर्व ग्राम समिती तसेच प्रभाग समिती यांना पत्र पाठवून निर्देश दिले आहेत. यात म्हटले आहे,   कोव्हिड रुग्णालयातून गृह अलगीकरणाचा शिक्का मारलेल्या व्यक्ती व गावात स्वतंत्र घर किंवा खोली किंवा वस्तीवर स्वतंत्र राहण्याची व्यवस्था असणाऱ्या व्यक्ती (प्रतिज्ञापत्र, हमी पत्र घेणे बंधनकारक) (ग्राम, प्रभाग समितीने खात्री करण्याच्या अटीवर) गृह अलगीकरणात राहतील.
            कोव्हिड रुग्णालयातून गृह अलगीकरणाचा शिक्का मारलेल्या व्यक्ती पंरतु त्यांना गावात स्वतंत्र राहण्यास खाली व व्यवस्था नसल्यास व अशा व्यक्तीस विषाणू संसर्ग झाला असल्यास त्याचा प्रादुर्भाव वाढेल अशी ग्राम समितीची धारणा झाल्यास ग्राम समितीस अशा व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरण करण्याबाबत अधिकार असेल.
            कोव्हिड रुग्णालयात संस्थात्मक अलगीकरण शिक्का मारुन ग्रामस्तरीय समितीकडे संदर्भीत केलेल्या व्यक्तींना ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे.
            कोल्हापूर जिल्ह्याबाहेरुन आलेली एखादी व्यक्ती जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या कोव्हिड-19 तपासणी केंद्रात न जाता परस्पर गावात, शहरात प्रवेश करीत असेल तर अशा व्यक्तीस प्रथम ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. अशा व्यक्तीस नजिकच्या कोव्हिड रुग्णालय, केअर सेंटर, हेल्थ सेंटर येथे जावून तपासणी करुन घेणे बंधनकारक करावे. तपासणी अंती अहवाल निगेटिव्ह आला तरीही अशी व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात राहील. याबाबत ग्रामस्तरीय समितीने, प्रभाग समितीने दक्षता घ्यावी.
            गावातील ज्या व्यक्ती वाहन चालक किंवा क्लीनर म्हणून काम करतात व कोल्हापूर जिल्ह्याबाहेर जातात किंवा जिल्ह्यातील बाधित क्षेत्रात ट्रक, टेम्पो, तीन चाकी गाड्या, ट्रेलर, जेसीबी, पोक्लेन मशीन घेवून जतात व कोरोना बाधित व्यक्तींची संपर्कात येण्याची शक्यता आहे अशा व्यक्तींना ग्रामस्तरीय संस्थात्मक अलगीकरणात किंवा त्यांच्या घरी राहण्यासाठी स्वतंत्र खोली असल्यास गृह अलगीकरण करावे. अशा व्यक्ती पुढील कालावधीत त्यांचे कुटुंबिये किंवा गावातील इतर व्यक्तींच्या थेट संपर्कात राहणार नाहीत याबाबत ग्रामस्तरीय समितीने वेळोवेळी तपासणी करुन दक्षता घ्यावी.
            वरील बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व त्यास सहाय करणाऱ्या सर्व संबंधित व्यक्तींवर अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात यावी, असेही म्हटले आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.