** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, May 27, 2020

जिल्ह्यात एकूण 402 पॉझीटिव्ह शाहूवाडीत सर्वाधिक 135 -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर,दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत 592 प्राप्त अहवालापैकी 19 अहवाल पॉझीटिव्ह आले तर 573 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 402 पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 135 रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज  काल सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यत प्राप्त  19 पॉझीटिव्ह अहवालामध्ये भुदरगड-2, गडहिंग्लज -1, हातकणंगले- 1, शाहूवाडी -14, नगरपरिषद क्षेत्र- 1, असा समावेश आहे.
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 32, भुदरगड- 51, चंदगड- 25, गडहिंग्लज- 16, गगनबावडा- 6, हातकणंगले- 5, कागल- 11, करवीर- 11, पन्हाळा- 20, राधानगरी- 48, शाहूवाडी- 135, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-20 असे एकूण 396 आणि पुणे -1,  सोलापूर-2, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सहा असे मिळून एकूण 402 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.