कोल्हापूर, दि. 18 (जिल्हा माहिती
कार्यालय) : लॉकडाऊनमुळे
जिल्ह्यात अडकलेल्या राज्याबाहेर जाणाऱ्या आणि राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 51
हजार 579 व्यक्ती तर महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्हयामध्ये जाणाऱ्या आणि
महाराष्ट्रातील अन्य जिल्हयामधुन येणाऱ्या 19 हजार 149 व्यक्ती असल्याची माहिती
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हयातून राज्याबाहेर जाणाऱ्या आणि
राज्याबाहेरुन जिल्हयात येणाऱ्या 51 हजार 549 व्यक्तींमध्ये राज्याबाहेर जाणाऱ्या 50
हजार 280 तर राज्याबाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या 1 हजार 299 व्यक्तींचा समावेश आहे.
तसेच महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये जाणाऱ्या आणि महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामधुन
येणाऱ्या 19 हजार 149 व्यक्तींमध्ये महाराष्ट्र राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये
जाणाऱ्या 11 हजार 455 तर महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यामधुन येणाऱ्या 7 हजार 694
व्यक्तींचा समावेश असल्याचेही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.