कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात
अडकलेले मध्यप्रदेशमधील 707 तसेच सांगली जिल्ह्यामधील 242 जण आजअखेर रवाना झाले
आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार,
विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत.
मध्यप्रदेशमधील 707, कर्नाटक 358, तामिळनाडूमधील 140, राजस्थान 49, बिहारमधील 25 व
पूर्वेकडील राज्य 34 असे 1 हजार 313 जण रवाना झाले आहेत.
कोल्हापूर
जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाणाऱ्यापैकी मुंबई शहर 25, ठाणेमधील १७,
पालघरमधील 4, रायगडमधील 8, रत्नागिरीमधील 41, सिंधुदुर्गमधील ४9, सातारामधील 20,
सांगलीमधील 242, सोलापूरमधील 132, पुण्यामधील 108, नाशिकमधील 46, धुळे १०,
जळगावमधील 9, अहमदनगरमधील 26, औरंगाबादमधील 4, बीड 18, जालनामधील 2, उस्मानाबादमधील
32, लातुरमधील 55, नांदेडमधील 4, परभणीमधील 5, अकोलामधील 1, बुलढाणामधील 1, यवतमाळमधील 1,
वाशिम 14 , नागपूरमधील 8 आणि चंद्रपूरमधील १ असे एकूण 883 जण
रवाना झाले आहेत.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.