कोल्हापूर,दि.
24 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजता 651 प्राप्त अहवालापैकी 8 अहवाल
पॉझीटिव्ह आले तर 643 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 286
पॉझीटिव्ह रुग्ण असून त्यामध्ये सर्वाधिक शाहूवाडीत 95 रुग्ण आढळले आहेत, अशी
माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय
रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 15, भुदरगड- 33, चंदगड- 18, गडहिंग्लज- 13,
गगनबावडा- 6, हातकणंगले- 3, कागल- 1, करवीर- 10, पन्हाळा- 15, राधानगरी- 42,
शाहूवाडी- 95, शिरोळ- 5, नगरपरिषद क्षेत्र- 10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-16
असे एकूण 282 आणि मुंबई -1, कर्नाटक-२ आणि
आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील चौघे असे मिळून एकूण 286 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.