** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, May 12, 2020

जागतिक परिचारिका दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्र्यांकडून गुलाब पुष्प देवून शुभेच्छा




          कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) :  जागतिक परिचारिका दिनाच्या निमित्ताने येथील सीपीआर रुग्णालयास आज सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देवून रुग्णालयातील परिचारिकांना गुलाब पुष्प देवून शुभेच्छा दिल्या.  
          कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये सारे जग संघर्ष करीत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील अनेक घटक रात्रंदिवस काम करीत आहेत, यामध्ये परिचारिकांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आह. कोरोना विरुद्धच्या या लढाईत परिचारिका आघाडीवर राहून आपल्या जिवाची पर्वा न करता श्रम करीत आहेत ही बाब अतिशय कौतुकाची आहे, अशा शब्दात सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी शुभेच्छा दिल्या.
          यावेळी सीपीआर च्या अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये, उपअधिष्ठाता डॉ. सुदेश गंधम, डॉ. सुनीता रामानंद, डॉ. डी.ए.पावले, शामल पुजारी, चारूबाला साळोखे, नेहा कापरे, सुमन पोवार, सुरेखा गावडे, विनय खोडवे आदी उपस्थित होते.
0 0 0 0 0 0  0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.