** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, May 9, 2020

मध्यप्रदेशमधील ६९२ तर सांगलीमधील १२२ कामगार रवाना -जिल्हाधिकारी दौलत देसाई



          कोल्हापूर, दि. ९ (जिल्हा माहिती कार्यालय) :  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेले मध्यप्रदेशमधील ६९२ राजस्थानमधील ४९, कर्नाटकमधील १५ असे परराज्यातील ८०५ कामगार तसेच सांगली जिल्ह्यामधील १२२ जण आजअखेर रवाना झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये स्थलांतरित कामगार, विद्यार्थी, पर्यटक, यात्रेकरु, प्रवासी आणि इतर नागरिक अडकले आहेत. अशा परराज्यातील १८ हजार ८१६ जणांची यादी संबंधित राज्यातील त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली होती. यामध्ये बिहार २११, मध्यप्रदेश ८१४,  राजस्थानमधील ८३, कर्नाटकमधील १५, तामीळनाडू ४९ अशा १ हजार १७२ जणांना संबंधित राज्याकडून मंजुरी मिळाली आहे. मंजुरीनंतर मध्यप्रदेशमधील ६९२, राजस्थानमधील ४९, कर्नाटकमधील १५ आणि तामीळनाडूमधील ४९ असे ८०५ जण रवाना झाले आहेत. 
            कोल्हापूर जिल्ह्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात जाणाऱ्या ६ हजार ४६७ जणांची यादी त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आली आहे. त्यापैकी ठाणे ३१७, रत्नागिरी ३७, सिंधुदुर्ग ४०, सांगलीमधील १ हजार ५०, सोलापूरमधील ४९२, पुण्यातील १५१४, नाशिकमधील ५७, धुळे १०३, जळगावमधील ५८, अहमदनगर १५७, औरंगाबादमधील ३९, बीड १५४, उस्मानाबाद १६६,  लातुरमधील १६७, नांदेडमधील ११, बुलढाणामधील ३५, वाशिम १९,  चंद्रपूरमधील ५१,  आणि गोंदियामधील २५ अशा ४ हजार ४९२ जणांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी सिंधुदुर्गमधील ४०, सांगली १२२, सोलापूर २, पुणे ४०, नाशिक ११, जळगाव ८, लातूर ३१ असे एकूण २७२ जण रवाना झाले आहेत.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.