कोल्हापूर,
दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 733 प्राप्त अहवालापैकी 2 हजार 214 निगेटिव्ह तर 461
अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (3 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह तर 55 अहवाल नाकारण्यात
आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 573 प्राप्त अहवालापैकी
निगेटिव्ह 420 तर 153 पॉझीटिव्ह (100 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी
पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 240 पॉझीटिव्ह आले असे एकूण 854 अहवाल
पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 28 हजार 843 पॉझीटिव्हपैकी 18 हजार 451 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 9 हजार 517 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 854 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-40, भुदरगड- 11,
चंदगड-8, गडहिंग्लज-25, गगनबावडा- 1, हातकणंगले- 101, कागल-28, करवीर-85, पन्हाळा-
57, राधानगरी- 27, शाहूवाडी-16, शिरोळ- 26, नगरपरिषद क्षेत्र- 92, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र- 301 व इतर शहरे व राज्य 36 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-492, भुदरगड- 643,
चंदगड- 637, गडहिंग्लज- 660, गगनबावडा- 73, हातकणंगले-3330, कागल-911 , करवीर-3135,
पन्हाळा- 1011, राधानगरी- 767, शाहूवाडी- 608, शिरोळ- 1614, नगरपरिषद क्षेत्र-4935,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 9164 असे एकूण 27 हजार 980 आणि इतर जिल्हा
व राज्यातील - 863 असे मिळून एकूण 28 हजार 843 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 28 हजार 843 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी
18 हजार 451 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 875 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 9 हजार
517 इतकी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.