** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, September 6, 2020

सीपीआरकडे कोविड रुग्णासाठी 114 व्हेंटिलेटर्स उपलब्ध अतिरिक्त 20 पीएम केअरची व्हेंटिलेटर्स कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया सुरु नादुरुस्त 18 व्हेंटिलेटर्स दुरुस्त करुन कार्यान्वित केली जात आहेत -अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के सीपीआरकडे 430 खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध

 


कोल्हापूर, दि. 6 (जिल्हा माहिती कार्यालय)- सीपीआर रुग्णालयात आजमितीस  कोविड 19 रुग्णासाठी 114 व्हेंटिलेटर्स उपलब्ध असून अतिरिक्त 20 पीएम केअरची व्हेंटिलेटर्स कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. याशिवाय अतिरिक्त 3 व्हेंटीलेटर्स जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाली असून ती लवकरच कार्यान्वीत करण्यात येतील. तसेच तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली 18 व्हेंटिलेटर्स दुरुस्त करुन कार्यान्वित केली जात असल्याचे स्पष्टीकरण छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपाचार रुग्णालय व  राजर्षि शाहु महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी केले आहे.

सी.पी.आर. रुग्णालयामध्ये सुरुवातीस कोविड 19 रुगणांसाठी 23 (व्हेंटिलेटर्स/बायपॅप/एनआयव्ही ) व्हेंटीलेटर्स उपलब होती. आजरोजी या रुग्णालयात  कोविड 19 रुग्णासाठी 54 व्हेंटिलेटर्स व 60 नॉन  इनवेझिव्ह व्हेंटिलेटर्स अशी मिळून 114 व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत. अतिरिक्त 20 पीएम केअरची व्हेंटिलेटर्स कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया सुरु असून याकरीता इंजिनियर हे सी.पी.आर. रुग्णालयात आलेले आहेत. ही व्हेंटिलेटर्स लवकरात लवकर कार्यान्वित करण्याबाबत प्रयात्नशील आहेत. याशिवाय अतिरिक्त  3 व्हेंटीलेटर्स जिल्हा परिषदेकडून प्राप्त झाली असून ती लवकरच कार्यान्वीत करण्यात येतील. तसेच जुने 9 व नवीन 9 अशी 18 व्हेंटिलेटर्स काही तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त होती. ही व्हेंटीलेटर्स सुध्दा दुरुस्त करुन कार्यान्वित केली जात आहेत.

सीपीआरकडे 430 खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध

छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार, रुग्णालय कोल्हापूर हे रुग्णालय 1 ऑगस्ट, 2020 पासून संपूर्णपणे कोविड म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस या रुग्णालयात 360 खाटा कोविड रुग्णांकरिता उपलब्ध होत्या, आजरोजी कोविड रुग्णांकरिता या  रुग्णालयात 450 खाटा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत  तसेच ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस या रुग्णालयात 64 आयसीयु खाटा उपलब्ध होत्या, त्या आजरोजी 92 आयसीयु खाटा कार्यन्वित आहेत. सुरुवातीस 104  ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत्या, आजरोजी 430 खाटांना ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच या रुग्णालयात हाय फ्लो नेजल 2, नॉन इनव्हेझिव्ह व्हेंटिलेटर्स 6 इ. यंत्रसामुग्रीसह रेमडीसीविर, टोसीलोमॉब  व फ्लॅविपिराविर यासारखी अतिमहत्वाची औषधे उपलब्ध आहेत. सी.पी.आर, रुग्णालयात कोव्हिड रुग्णांचे डायलेसिस करण्यासाठी 2 मशीन उपलब्ध असून त्याव्दारे आजपर्यंत 112 कोविड पॉझिटीव्ह रुग्णांचे डायलेसिसीस करण्यात आले आहे.

कोविड 19 मुळे बाधित होणाऱ्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे ऑक्सिजनची मागणी मोठया प्रमाणात वाढल्यामुळे 20 kL ची ऑक्सिजन टँक नव्याने कार्यान्वित करण्यात आली असून ती उत्तमरिया सुरु आहे. तसेच जवळपास 33 कोव्हिड रुग्णांना प्लाझ्मा थेरपी देण्यात आली असून या बाबतीत हे रुग्णालय महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तसेच कोव्हिड 19 च्या अनुषंगाने कोल्हापूर शहरातीत 26 तज्ञ डॉक्टरांच्या सेवा सी.पी.आर. रुग्णालयास उपलब्ध करण्याकरीता जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी 5 सप्टेंबररोजी आदेश दिले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांच्या सेवा लवकरच उपलब्ध होणार असून रुग्ण व्यवस्था सुरळीत असल्याचे डॉ. म्हस्के यांनी स्पष्ट केले.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.