कोल्हापूर,
दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 1 हजार 883 प्राप्त अहवालापैकी 1 हजार 342 निगेटिव्ह तर 518
अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 अहवाल दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह तर 21 अहवाल नाकारण्यात
आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 775 प्राप्त अहवालापैकी
निगेटिव्ह 627 तर 148 पॉझीटिव्ह (143 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी
पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 275 पॉझीटिव्ह आले असे एकूण 941 अहवाल
पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात आजअखेर एकूण 30 हजार 304 पॉझीटिव्हपैकी 19
हजार 325 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 45
पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील
यांनी आज दिली.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 941 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-26, भुदरगड- 5,
चंदगड-18, गडहिंग्लज-35, गगनबावडा- 2, हातकणंगले- 94, कागल-89, करवीर-90, पन्हाळा-
28, राधानगरी- 26, शाहूवाडी-44, शिरोळ- 43, नगरपरिषद क्षेत्र- 98, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र- 301 व इतर शहरे व राज्य 42 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-528, भुदरगड- 663,
चंदगड- 671, गडहिंग्लज- 700, गगनबावडा- 80, हातकणंगले-3508, कागल-1032, करवीर-3271,
पन्हाळा- 1073, राधानगरी- 810, शाहूवाडी- 681, शिरोळ- 1667, नगरपरिषद क्षेत्र-5109,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 9601 असे एकूण 29 हजार 394 आणि इतर जिल्हा
व राज्यातील - 910 असे मिळून एकूण 30 हजार 304 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 30 हजार 304 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी
19 हजार 325 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 934 जणांचा मृत्यू झाला
असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10 हजार 45 इतकी
आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.