** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 8, 2020

मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘विकेल ते पिकेल’ अभियान राज्यभर लागू करण्यात येणार - जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे

 


कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘विकेल ते पिकेल’ हे अभियान राज्यभर लागू करण्यात येणार आहे.  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) या जागतिक बँक अर्थसहाय्यीक प्रकल्पाचा शुभारंभ मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते दिनांक 10 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वा संपन्न होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी कळविले आहे.

कार्यक्रम ऑनलाईन होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण कृषी विभागाच्या https://www.youtube.com/c/agriculturedearmentgom या यु-टयुब चॅनलवरुन करण्यात आहे.

यामध्ये स्मार्ट प्रकल्पाव्दारे राबविण्यात येणारे विविध प्रकल्प तसेच विविध घटकांसाठी अर्थसहाय्य याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री राज्यातील शेतकऱ्यांशी विकेल ते पिकेल या संकल्पनेवर व धोरणाबाबत संवाद साधणार आहेत. जास्ती जास्त शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, ग्रामीण महिला गट यांनी वरील लिंक व्दारे सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी स्थानिक पातळी वर संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी कळविले आहे.

0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.