** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 4, 2020

मनमंदिर वस्तीस्तर संघाकडून पंचगंगा स्मशानभूमीला 2 हजार शेणीदान

 


  कोल्हापूर, दि. 4 (जिल्हा माहिती कार्यालय) :महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत स्थापित स्फूर्ती पोर्ले मधील दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मनमंदिर वस्तीस्तर संघाने कोल्हापूर पंचगंगा स्मशान भूमीला 2 हजार शेणी दान केल्या.

पंचगंगा स्मशानभूमीमध्ये अत्यसंस्काराकरिता लागणाऱ्या शेणींसाठी महानगरपालिका प्रशासनाने केलेल्या आव्हानानुसार मनमंदिर वस्तीस्तर संघाने पुढाकार घेवून शेणीदान करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये मनमंदिर वस्तीस्तर संघातील बचत गटाच्या माध्यमातून कोल्हापूर पंचगंगा स्मशान भूमीला 2000 शेणी दान केल्या. या  उपक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाचे  जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, उमेश लिंगनूरकर, संभाजी देवणे, व्यवस्थापक कुंभार, क्षेत्रीय समन्वयक, सहयोगिनी, मनमंदिर वस्तीस्तर संघातील पदाधिकारी बचत गटातील महिला सभासद उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.