कोल्हापूर,
दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 696 प्राप्त अहवालापैकी 2 150 हजार निगेटिव्ह तर 520
अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (5 अलवाह प्रलंबित व
21 अहवाल नाकारण्यात आले), अॅन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 396
प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 293 तर 103 पॉझीटिव्ह (107 निगेटिव्ह अहवाल
आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मधील 268 पॉझीटिव्ह आले
असे एकूण 891 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 33 हजार 111 पॉझीटिव्हपैकी 21 हजार 441 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 10 हजार 660 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा
शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 891 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-15, भुदरगड- 24,
चंदगड-22, गडहिंग्लज-22, गगनबावडा- 5, हातकणंगले- 97, कागल-48, करवीर-124,
पन्हाळा- 25, राधानगरी- 12, शाहूवाडी-33, शिरोळ- 39, नगरपरिषद क्षेत्र- 127,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 259 व इतर शहरे व राज्य 39 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-575, भुदरगड- 719,
चंदगड- 712, गडहिंग्लज- 771, गगनबावडा- 91, हातकणंगले-3843, कागल-1123, करवीर-3618,
पन्हाळा- 1166, राधानगरी- 867, शाहूवाडी- 766, शिरोळ- 1815, नगरपरिषद क्षेत्र-5468,
कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 10 हजार 533 असे एकूण
32 हजार 67 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 1 हजार 44 असे मिळून एकूण 33 हजार 111 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या
आहे.
जिल्ह्यातील एकूण 33 हजार 111 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी
21 हजार 441 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 10 जणांचा मृत्यू
झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 10
हजार 660 इतकी आहे.
0000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.