** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, September 11, 2020

विना मास्क 40 जणांना जयसिंगपूर नगरपरिषदेकडून 4 हजार दंड

 


कोल्हापूर, दि. 11 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 40 जणांकडून 4 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर विना मास्क फिरणाऱ्या 1155 व्यक्तींकडून 1 लाख 18 हजार 730 रुपये दंडाची वसुली केली आहे.

हातकणंगले नगरपंचायतने आज विना मास्क फिरणाऱ्याकडून  2 हजार 700 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 21 हजार 50 रुपये दंडाची वसुली केली आहे.

 गडहिंग्लज नगरपरिषदे कडून आज विना मास्क फिरणाऱ्या 16 नागरिकांकडून 1 हजार 600 रुपये दंड वसूल केला आहे. आज पर्यंत 1849 नागरिकांकडून 2 लाख 70 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.

कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या  9 जणांकडून 900 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 1125 जणांकडून 1 लाख 12 हजार 500 रुपये दंडाची वसुली केली आहे.

0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.