कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राधानगरी धरणात 229.570 दलघमी
पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 39963 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी
मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प व दूधगंगा मोठा प्रकल्प क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा नदीवरील- इचलकरंजी हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 103.96 टीएमसी तर
अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 97.912 दलघमी, वारणा 963.388 दलघमी, दूधगंगा 719.120 दलघमी,
कासारी 76.990 दलघमी, कडवी 68.800 दलघमी, कुंभी 75.230 दलघमी, पाटगाव 105.170
दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी,
घटप्रभा 43.206 दलघमी,
जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 13.10, सुर्वे 16 फूट, रुई 42 फूट,
इचलकरंजी 39 फूट, तेरवाड 38.9 फूट, शिरोळ 30.9 फूट, नृसिंहवाडी 28.6 फूट, राजापूर 18.3
फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 11.10 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.