कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती
कार्यालय) : राधानगरी धरणात 224.674 दलघमी
पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 400 तर
अलमट्टी धरणातून 18172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प व
चिकोत्रा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पंचगंगा नदीवरील- राजाराम, रूई, इचलकरंजी,
तेरवाड व शिरोळ असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत.
नजिकच्या कोयना धरणात 103.20 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका
पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील
धरणांमध्ये पुढीलप्रमाणे
पाणीसाठा आहे. तुळशी 98.054 दलघमी, वारणा 954.468 दलघमी, दूधगंगा 717.763 दलघमी,
कासारी 78.043 दलघमी, कडवी 70.303 दलघमी, कुंभी 74.010 दलघमी, पाटगाव 104.090
दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी,
घटप्रभा 42.540 दलघमी,
जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.
तसेच
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 16.9 फूट, सुर्वे 18 फूट, रुई 44.8
फूट, इचलकरंजी 42.6 फूट, तेरवाड 42 फूट, शिरोळ 34 फूट, नृसिंहवाडी 29 फूट, राजापूर
21.3 फूट तर नजीकच्या सांगली 13 फूट व अंकली 15.5 फूट अशी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.