** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 7, 2020

राधानगरीतून 400; अलमट्टीतून 18422 क्युसेक विसर्ग सुरू

 


                कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 224.780 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरी धरणातून 400 तर अलमट्टी धरणातून 18422 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  पाटगाव मध्यम प्रकल्प 99 टक्के तुळशी मोठा प्रकल्प 99.81,टक्के जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, कासारी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूरर, राजाराम, सुर्वे, रूई व इचलकरंजी असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 102.99 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.101 दलघमी, वारणा 953.694 दलघमी, दूधगंगा 717.084 दलघमी, कासारी 78.565 दलघमी, कडवी 70.678 दलघमी, कुंभी 73.570 दलघमी, पाटगाव 104.570 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.414 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  42.731 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 18 फूट, सुर्वे 18.8 फूट, रुई 44 फूट, इचलकरंजी 41 फूट, तेरवाड 38.6 फूट, शिरोळ 30.6 फूट, नृसिंहवाडी 28 फूट, राजापूर 15.3 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 12.2 फूट अशी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.