** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 10, 2020

5 बंधारे पाण्याखाली अलमट्टीतून 61422 क्युसेक विसर्ग सुरू

 


                कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 226.159 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 61422 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, चिकोत्रा मध्यम प्रकल्प व दूधगंगा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ व दुधगंगा नदीवरील- दत्तवाड  असे एकूण 5 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 103.41 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 122.831 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 97.912 दलघमी, वारणा 957.566 दलघमी, दूधगंगा 719.120 दलघमी, कासारी 76.990 दलघमी, कडवी 69.554 दलघमी, कुंभी 74.440 दलघमी, पाटगाव 104.490 दलघमी, चिकोत्रा 43.115 दलघमी, चित्री 53.268 दलघमी, जंगमहट्टी 34.650 दलघमी, घटप्रभा  41.898 दलघमी, जांबरे 23.230 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.060 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 15.7, सुर्वे 17.6 फूट, रुई 44 फूट, इचलकरंजी 42 फूट, तेरवाड 40 फूट, शिरोळ 32 फूट, नृसिंहवाडी 28.6 फूट, राजापूर 19.3 फूट तर नजीकच्या सांगली 9.3 फूट व अंकली 10.6 फूट अशी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.