कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 89 जणांकडून 8 हजार 900 रुपयांचा
दंड वसूल केला आहे.
कुरुंदवाड
नगरपरिषदेने तीन पथकाची स्थापना करुन विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई सुरु
केली आहे. आजअखेर 1 हजार 30 जणांकडून 1 लाख 3 हजार 100 रुपये दंडाची वसुली केली
आहे.
चंदगड नगरपंचायतीकडून विना
मास्क फिरणाऱ्या 6 नागरिकांकडून 600 रुपये दंड वसूल केला आहे.
गडहिंग्लज नगरपरिषदेकडून
आज विना मास्क फिरणाऱ्या एका नागरिकांकडून 100 रुपये दंड वसूल केला आहे. आज पर्यंत
1810 नागरिकांकडून 2 लाख 66 हजार 700 रुपये दंड वसूल केला आहे.
मलकापूर नगरपरिषदेकडून आज
विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 6 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे.
हातकणंगले नगरपंचायतीकडून
आज विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून 1 हजार 900 रुपये दंड वसूल केला आहे.
आजरा नगरपंचायीतकडून आज विना मास्क फिरणाऱ्या 10 नागरिकांकडून
1 हजार रुपये दंड वसूल केला आहे. आज अखेर विना मास्क 798 नागरिकांकडून 1 लाख 8
हजार 450 रुपये दंड वसूल केला आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.