कोल्हापूर, दि. 8 (जिल्हा माहिती कार्यालय) : बाल शक्ती
पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार 2021 या पुरस्कारासाठी www.nca-wcd.nic.in
या संकेतस्थळावर दि. 15 सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारले जाणार
आहेत, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती एस.डी. शिंदे यांनी कळविले
आहे.
ज्या मुलांनी (वय-5 पेक्षा
अधिक व 18 वर्षा पर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपुर्ण
शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपुर्ण कामगिरी केलेली आहे.
त्यांना बाल शक्ती पुरस्कार दिला जातो.
मुलांच्या विकास, संरक्षण
व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त
भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस वैयक्तिक पुरस्कार दिला जातो.
संस्था स्तरावर बाल कल्याण
क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला संस्था स्तरावर हा पुरस्कार दिला
जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान
10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.