कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय): मागासवर्गीय
शिष्यवृत्तीधारक सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारची फी वसुल
करू नये. तसे आढळल्यास संबंधित महाविद्यालयाविरूध्द समाज कल्याण विभागामार्फत
फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्यात येईल, असे आदेश समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त
बाळासाहेब कामत यांनी दिले.
जिल्ह्यातील
महाडिबीटी या संकेतस्थळावर शासनमान्य अनुदानित व विना अनुदानित महाविद्यालयांचे मान्यताप्राप्त
अभ्यासक्रम सुरू असणाऱ्या महाविद्यालयांनी सामाजिक न्याय विभागाच्या शासन
निर्णयामधील निर्देशानुसार या योजनेखाली शासकीय व मान्यताप्राप्त विद्यापीठ संलग्न
अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती व
शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्राप्त करून घेण्याची जबाबदारी संबंधित
प्राचार्याची राहिल. यात विलंब, गैरप्रकार अथवा काही अपहार झाल्यास संबंधित
शैक्षणिक संस्थेविरूध्द दंडनीय कार्यवाही /किंवा व्यवस्थापन त्याबाबतची जबाबदारी
संबंधितांवर निश्चित करून संबंधितांविरूध्द शिस्तभंगाची कारवाई करेल. ज्या प्रकरणी
सकृत दर्शनी प्राचार्य जबाबदार असल्यास समाजकल्याण अधिकारी गुन्हा दाखल करतील.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.