** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, September 2, 2020

बेरोजगार उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी

 

कोल्हापूर, दि. 2 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील आस्थापनांनी जास्तीत-जास्त रिक्तपदांची मागणी बेरोजगार उमेदवारांनी आपली नोंदणी कौशल्य विकास,रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.

        अटी शर्तीच्या आधारे सुरु झालेल्या औद्योगिक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात मनुष्य बळाची कमतरता भासत आहे. कोरोना जागतिक महामारीमुळे उमेदवार तसेच संपूर्ण जनतेला संचारबंदी असल्याने बेरोजगार रोजगार शोधासाठी बाहेर जाऊ शकत नाहीत. यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात 12 उद्योजकांनी सहभाग नोंदवला आहे. 246 रिक्तपदे आहेत. 537 बेरोजगार उमेदवारांनी दूरध्वनीद्वारे मुलाखती दिल्या त्यापैकी 129 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली प्रत्यक्ष 33 जणांची अंतिम निवड करण्यात आली.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.