कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : सर्व
प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागातील सर्व अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे
डिसेंबर 2019 पर्यंतच्या सेवापुस्तकातील सर्व नोंदी 30 सप्टेंबरपर्यंत अद्ययावत
करा. त्याचप्रमाणे त्यांच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयांचे सर्व शासकीय
अधिकारी/कर्मचारी यांच्या माहे डिसेंबर 2019 पर्यंतच्या सेवापुस्तकातील सर्व नोंदी
15 ऑक्टोंबरपर्यंत अद्ययावत करा, अशा सूचना उप सचिव गीता कुलकर्णी यांनी दिल्या.
मानव संसाधन व्यवस्थापन
प्रणाली ही संगणकीय प्रणाली एनआयसी मार्फत विकसित करण्याची कार्यवाही सुरू करण्यात
आली आहे. याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी/ कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ई-सेवा
रूपांतरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी ई-सेवापुस्तकाची प्रणाली प्रथमच विकसित
करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या
सध्याच्या सेवापुस्तकातील माहिती ई-सेवा पुस्तकामध्ये अंतर्भूत करण्यात येणार आहे.
ही बाब विचारात घेता ई-सेवा पुस्तकाची प्रणाली विकसित होईपर्यंत दरम्यानच्या
कालावधीत सर्व शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांचे सध्याचे सेवापुस्तक अद्ययावत करणे
आवश्यक आहे. जेणेकरून ई-सेवापुस्तक प्रणाली विकसित झाल्यानंतर त्यामध्ये तात्काळ
सेवापुस्तकाची अद्ययावत माहिती भरणे शक्य होईल.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.