** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 10, 2020

विना मास्क 44 जणांना जयसिंगपूर नगरपरिषदेकडून 4 हजार 350 दंड

 

कोल्हापूर, दि. 10 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील जयसिंगपूर नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या 44 जणांकडून 4 हजार 350 रुपयांचा दंड वसूल केला आहे.

जयसिंपूर नगरपरिषदेमार्फत 44 विना मास्क व्यक्तींकडून आजच्या दिवशी 4 हजार 350 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. आज अखेर विना मास्क 1115 व्यक्तींकडून 1 लाख 14 हजार 730 रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या एक व्यक्तीकडून 50 रुपये तर मास्क, ग्लोज न वापरणाऱ्या 7 फिरते फळ भाजी विक्रेत्याकडून 7 रुपये  दंड वसूल केला आहे.

 कुरुंदवाड नगरपरिषदेने आज विना मास्क फिरणाऱ्या  21 जणांकडून 2 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे. आजअखेर 1116 जणांकडून 1 लाख 11 हजार 600 रुपये दंडाची वसुली केली आहे.

गडहिंग्लज नगरपरिषदे कडून आज विना मास्क फिरणाऱ्या 13 नागरिकांकडून 1 हजार 300 रुपये दंड वसूल केला आहे. आज पर्यंत 1833 नागरिकांकडून 2 लाख 69 हजार 200 रुपये दंड वसूल केला आहे.

0 0 0 0 0 0

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.