** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 16, 2021

राधानगरी धरणातून 700 क्युसेक विसर्ग जिल्ह्यातील 18 बंधारे पाण्याखाली


 

      कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 232.16 दलघमी पाणीसाठा आहे. आज दुपारी 4 वाजल्याच्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 700 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये आज राधानगरी-232.16, तुळशी -97.62, वारणा -972.83, दूधगंगा-717.08, कासारी- 76.99, कडवी -71.24, कुंभी-74.88, पाटगाव 105.24, चिकोत्रा- 43.115, चित्री -53.410, जंगमहट्टी -34.65, घटप्रभा -43.450, जांबरे- 23.230 आंबेआहोळ - 30.978  इतका दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे - राजाराम 26.5, फूट, सुर्वे- 26, रुई 57, इचलकरंजी 55, तेरवाड 48.5, शिरोळ -45  तर नृसिंहवाडी 45.6 फूट इतकी पाणी पातळी आहे.

जिल्ह्यातील पडणाऱ्या पावसामुळे नदीवरील 18 बंधारे पाण्याखाली आहे. यामध्ये पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील-  राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील- चिंचोली,  माणगांव व तांदूळवाडी, कासारी नदीवरील- यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे,  दुधगंगा नदीवरील- दत्तवाड असे एकूण 18 बंधारे पाण्याखाली आहेत.

 

00000

 

 


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.