कोल्हापूर, दि. 27 (जि.मा.का.) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 4 ऑक्टोबर
रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती शिवाजी सभागृहात जिल्हाधिकारी राहुल
रेखावार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती निवासी
उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी दिली.
सोमवार 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या
लोकशाही दिनाचा लाभ जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी घ्यावा, तसेच शासनाकडील दिनांक 26
सप्टेंबर 2012 रोजीच्या शासनपरिपत्रकान्वये तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे
असावे. परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व , अपिल्स, सेवाविषयक ,आस्थापना विषयक
बाबी, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे. अशा प्रकरणी पुन्हा त्याच
विषयात केलेले अर्ज लोकशाही दिनात स्विकृत करण्यात येणार नाहीत, याची सर्व नोंद
घ्यावी, असेही श्री. जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.