कोल्हापूर, दि. 3 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील
प्रत्येक शासकीय, निमशासकीय कार्यालयात व खासगी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार
समिती तात्काळ गठीत करून त्याबाबतचा अहवाल जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,
कोल्हापूर या कार्यालयास सादर करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी
सुजाता शिंदे यांनी केले आहे.
शासन निर्णयानुसार कामाच्या ठिकाणी महिलांवर
होणाऱ्या लैंगिग छळाची तक्रार होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय, निमशासकीय
कार्यालयात व खासगी आस्थापनामध्ये अंतर्गत तक्रार समिती गठीत करण्याचे निर्देश
देण्यात आले आहेत.
अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या
कार्यालयाचे / आस्थापनांचे प्रमुख /मालकाने (अ) अंतर्गत तक्रार समिती स्थापन केली
नाही. (ब) अधिनियमातील कलम 13,14,22 नुसार कारवाई केली नाही (क) या कायद्यातील व नियमातील विविध तरतुदींचे
व जबाबदारीचे पालन न केल्यास कार्यालयाचे/ आस्थापनांचे प्रमुख /मालकाला 50 हजार रू. पर्यंत दंडाची तरतुद आहे. तसेच हाच
प्रकार पुन्हा केल्यास आस्थापनेचा परवाना रद्द करणे, दुप्पट दंडाची तरतुद आहे,
असेही त्यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.