** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 28, 2021

लंपी स्किन डिसीज जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग जनावरामध्ये कडक व गोल आकाराच्या गाठी दिसल्यास औषधोपचार करा - निवासी उपजिल्हाधिकारी- शंकरराव जाधव

 


            कोल्हापूर, दि. 28 (जिल्हा माहिती कार्यालय) : राज्यातील पुणे, नाशिक, रायगड व पालघर या जिल्ह्यांमध्ये पशुधनामध्ये लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. लंपी स्किन डिसीज हा गो व महिष वर्गातील जनावरांना होणार विषाणूजन्य त्वचा रोग आहे. या साथीच्या आजारात प्रामुख्याने जनावरांच्या शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या रोगाचा प्रसार इतर जिल्ह्यांमध्ये होण्याची शक्यता असल्याने रोग प्रसारास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने कडक व गोल आकाराच्या गाठी जनावरामध्ये दिसून आल्यास त्वरीत जवळच्या पशुधन वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व  जनावराचा औषधोपचार करुन घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.