** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 30, 2021

अनुसुचित जातींतील विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी 7 ऑक्टोबरपर्यंत महाविद्यालयांनी प्रस्ताव सादर करावेत

 


 

          कोल्हापूर, दि. 30 (जिमाका) : भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी योजनेअंतर्गत अनुसुचित जाती, विजाभज इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन २०११-१२ पासून Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमार्फत शिष्यवृत्तीचा लाभ दिला जात होता. ही ऑनलाईन प्रणाली सन २०१७-१८ या आर्थिक वर्षापासुन शासन स्तरावरुन बंद केली आहे. प्रणालीवरील सन २०११-१२ ने २०१६-१७ या कालावधीत तांत्रिक त्रुटी असल्यामुळे प्रलंबित असलेले अर्ज, सन २०१७-१८ मधील Mahaeschol या ऑनलाईन प्रणालीमध्ये नुतनीकरण केलेले मात्र देयक न निघाल्यामुळे प्रलंबित असणारे अर्ज तसेच सन २०१७-१८ मधील प्रथम वर्षास असणाऱ्या विद्यार्थ्यांचे नवीन अर्ज ज्या महाविदयालयांनी सहायक आयुक्त समाजकल्याण  कार्यालयाकडे अद्यापही सादर केलेले नाहीत अथवा सादर केलेले आहेत परंतु एखादा विद्यार्थी राहुन गेलेला आहे, अशा महाविद्यालयांनी  प्रस्ताव या कार्यालयास 7 ऑक्टोबरपर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.                     

जिल्हयातील महाविदयालयांना कार्यालयाकडून वारंवार झालेल्या बैठकीव्दारे Google Meet या ऑनलाईन प्रणालीवरुन होणाऱ्या बैटकामध्ये, कार्यालयांकडून वारंवार केलेला पत्रव्यवहार याव्दारे अर्ज सादर करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.

सन २०११-१२ ते सन २०१७-१८ या कालावधीतील प्रलंबित प्रस्ताव सादर करण्यासाठी ही अखेरची मुदत देण्यात येत आहे. महाविद्यालयाचे प्रस्ताव विहीत वेळेत कार्यालयास सादर करावेत. प्रस्ताव सादर न केल्यास व या कालावधीतील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासुन वंचित राहील्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील, असेही पत्रकात म्हटले आहे.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.