** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 27, 2021

पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटावा तहसीलदार मीना निंबाळकर

 






कोल्हापूर, दि. 26 (जिमाका): राधानगरी तालुका हा विविध जैव संपत्तीने नटलेला तालुका आहे. निसर्गाची देणगी लाभलेल्या या तालुक्यातील पर्यटन स्थळे आनंद देणारी असून त्याचा आनंद पर्यटकांनी लुटावा, असे आवाहन तहसीलदार श्रीमती निंबाळकर यांनी केले.

 

        जागतिक पर्यटन दिनानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यात 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीत पर्यटन सप्ताह साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राधानगरी तालुक्यात  पर्यटकांसाठी आयोजित केलेल्या पदभ्रमंती उपक्रमाचा शुभारंभ आज करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात तहसीलदार श्रीमती निंबाळकर बोलत होत्या.  कार्यक्रमास गोकुळ दूध संघाचे संचालक अभिजीत तायशेटे वनक्षेत्रपाल अजित माळी, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर, दिपक शेट्टी, रुपेश बोंबाडे, किरण पारकर,अतुल बोंबडे, रविकिरण सुतार व पर्यटक उपस्थित होते.

 

कार्यक्रमानंतर उपस्थित पर्यटकांसाठी कासारवाडी धबधबा व जंगल पदभ्रमंतीचे आयोजन करण्यात आले. पदभ्रमंतीमध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पर्यटकांनी सहभाग घेतला.

 

          राधानगरी तालुक्यात राधानगरी धरण, दूधगंगा धरण, तुळशी धरण, राऊतवाडी धबधबा, कासारवाडी धबधबा,दाजीपूर अभयारण्य यासह अनेक पर्यटनाची ठिकाणी आहेत. या पर्यटन स्थळांना भेटी देऊन पर्यटकांनी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटावा,असे आवाहन तहसीलदार श्रीमती निंबाळकर यांनी केले.

 

निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर माणसाच्या मनावरील ताण हलका होतो, यासाठी जैवविविधतेने नटलेल्या राधानगरी तालुक्यात पर्यटकांनी यावे आणि पर्यटनाचा आनंद लुटावा, असे आव्हान वनक्षेत्रपाल श्री. माळी यांनी केले.

0000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.