कोल्हापूर,
दि. 9 (जिमाका) : सार्वजनिक
गणेशोत्सव-2021 मध्ये सार्वजनिक गणेशमुर्तीचे मुखदर्शन अथवा मंडपात येऊन दर्शन घेण्यास
प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे
गणेश मंडळांनी उपलब्ध करुन द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी
दिले आहेत.
प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या
भाविकांसाठी शारिरिक अंतराचे तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर इत्यादी)
पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे, या मार्गदर्शक सूचना मध्ये बदल करून
"याऐवजी" गणेश मूर्तीचे मुखदर्शन अथवा प्रत्यक्ष मंडपात येऊन दर्शन
घेण्यास प्रतिबंध करण्यात येत असून दर्शन केवळ ऑनलाईन अथवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे
गणेश मंडळांनी उपलब्ध करुन द्यावे, असे आदेशात म्हटले आहे.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.