इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२

भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेच्या लाभासाठी 15 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज भरावेत - सहायक आयुक्त विशाल लोंढे

 



         कोल्हापूर, दि. 4 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसुचित जाती, विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनांचा लाभ दिला जातो. यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी  दि. 14 डिसेंबरपासून सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत दि. 15 फेब्रुवारी असल्याने लवकरात लवकर अर्ज भरावेत, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

          ज्या महाविद्यालयांचे अर्ज नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे, अशा महाविद्यालयांनी अर्ज नोंदणीसाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करावे. जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असणारे अर्ज छाननी करुन लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयकडे वर्ग करावेत.

तसेच गतवर्षीच्या तुलनेत सन २०२१-२२ या वर्षामध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज नोंदणीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कामकाज विहित वेळेत पार न पाडणाऱ्या संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही प्रसिध्दी पत्रकात नमुद आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.