इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

रामेतीमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण

 


       कोल्हापूर, दि. 16 (जिमाका): प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती)  विभागीय प्रशिक्षण संस्थेमार्फत दिनांक 18 फेब्रुवारीपर्यंत राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, येथील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली पुरस्कृत अनुसूचित जाती प्रवर्गातील उप योजनांतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांकरिता सक्षम बनविणे या विषयावर प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती प्रादेशिक कृषि विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी दिली आहे.

प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास, कृषि क्षेत्र स्टार्टअप योजना, महाराष्ट्र शासन समाजकल्याण विभागाच्या विविध योजना त्याचप्रमाणे कृषि विभागातील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी असलेल्या विविध शासकीय योजनांची माहिती व प्रकल्प अहवाल तयार करणे इ. बाबत तज्ञ व्याख्यात्यांकडून मार्गदर्शन होणार आहे.

प्रशिक्षण उद्घाटन समारंभासाठी डॉ. एस. एस. कांबळे, अनुसूचित जाती उप योजना समन्वयक, रा. छ.शा.म. कृ.म. कोल्हापूर डॉ. डी. डी. पतंगे, प्रमुख प्लेसमेंट आणि प्रशिक्षण विभाग, रा. छ.शा.म.कृ.म. कोल्हापूर तसेच उमेश पाटील, प्राचार्य, रामेती कोल्हापूर एस.आर. माळी, एन. एस. परीट व एच. एस. हावळे सहाय्यक संचालक रामेती हे उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.