इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धेसाठी 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर करा - उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे

 


 

कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): भारत निवडणूक आयोगाने 2022 च्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ‘माझे मत माझे भविष्य- एका मताचे सामर्थ्य’ ही राष्ट्रीय मतदार जागृती स्पर्धा सुरू केली आहे. "स्वीप" कार्यक्रमांतर्गत स्पर्धांचे आयोजन करुन जनतेच्या प्रतिमा आणि सर्जनशीलतेचा वापर लोकशाही बळकटीकरणासाठी करण्यात येत आहे. यामध्ये 5 प्रकारच्या स्पर्धा होणार असून यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धा, गीत स्पर्धा, व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आणि भित्तीचित्र स्पर्धांचा समावेश आहे. इच्छुकांनी 15 मार्चपर्यंत प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.

स्पर्धकांनी मार्गदर्शक तत्वे, नियम आणि अटीसाठी https://ecisveep.nic.in/contest/ या संकेतस्थळ पहावे. प्रवेशिका सर्व तपशीलांसह voter-contest@cci.gov.in इथे ईमेल कराव्यात. ई मेल करताना स्पर्धेचे नाव आणि श्रेणी याचा विषयात उल्लेख करावा. प्रश्नमंजूषा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा संकेतस्थळावर नोंदणी करावी. सर्व प्रवेशिका १५ मार्च २०२२ पर्यंत सहभागी स्पर्धकांच्या तपशीलासह voter-contest@cci.gov.in या ईमेलवर पाठवण्यात याव्या, असेही आयोगाच्या वतीने कळवण्यात आले आहे.

00000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.