कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): सर्वसामान्य लोकांमध्ये क्षयरोगविषीयी जनजागृती करणे व क्षयरोगाची
लक्षणे, उपचार, टी.बी. विषयक शासकीय योजना व क्षयरोग नोटिफिकेशन कायदा या विषयी नागरिकांमध्ये
जनजागृतीसाठी जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण व जिल्हा
परिषदेचे उपाध्यक्ष जयवंत शिंपी यांच्या हस्ते
जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल. ई. डी. सरकते संदेशचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण,
शशिकांत खोत, विजय पाटील, अमर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु.जी.कुंभार उपस्थित होते.
क्षयरोग जनजागृतीपर बोर्डवर निःशुल्क रोगनिदान व औषधोपचार माहिती, निक्षय
पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत 500 रु. पोषण आहारासाठी
आर्थिक मदत (शासकीय व खासगी दवाखान्यातील) रुग्णाच्या खात्यात जमा करणे,
क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमांतंर्गत वैद्यकीय व्यावसायिकास 500 रु. मानधन व
क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा 500 रु. मानधन, क्षयरूग्णाचा उपचार
यशस्वीपणे पूर्ण करणाच्या उपचार सहाय्यकास रुग्णामागे 1 हजार रुपये मानधन इ. सुविधांविषयक माहिती, तसेच रुग्णांची नोंद न केल्यास संबंधित खासगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (1860
च्या 45) च्या कलम माहिती 269 आणि 270 च्या अतंर्गत
शिक्षा होऊ शकते. याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
00000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.