इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १४ फेब्रुवारी, २०२२

प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवथापकीय समितीवर नेमणुकीसाठी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत

 

 

     कोल्हापूर, दि. 14 (जिमाका): जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीचा कार्यकाल तीन वर्षांचा असल्याने दि. 16 जानेवारी 2022 रोजी समाप्त झाला आहे. जिल्ह्यातील प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीवर नवीन अशासकीय सदस्यांची नेमणूक करावयाची असून यासाठी इच्छुकांनी 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त  डॉ. वाय.ए.पठाण यांनी केले आहे.

            जिल्ह्यातील गोशाळा / पांजरपोळ संस्थांपैकी एका संस्थेचा अध्यक्ष, प्राणी कल्याणविषयक कार्य करणाऱ्या सेवाभावी संस्थेचे दोन सदस्य, सर्वसाधारण समितीने नामनिर्देशित केलेल्या दोन व्यक्ती व जिल्हयातील मानवहितकारक कार्य करणारे / प्राण्यांवर प्रेम करणारे, प्राणी कल्याणासाठी काम करणारे पाच ते सहा कार्यकर्त यांची नेमणूक करावयाची आहे.

         विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, ताराबाई पार्क, कोल्हापूर कार्यालयात दि. 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत सादर करावेत. अर्जाचा नमुना एनआयसी, कोल्हापूर यांच्या पोर्टलवर तसेच जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.