कोल्हापूर,
दि. 10 (जिमाका) : धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या
शासनमान्य शैक्षणिक संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देऊन शिक्षणाचा
दर्जा उंचावण्यासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या अनुदान योजनेसाठी
संबंधितांनी आपले प्रस्ताव 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन
जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी केले आहे.
या योजनेच्या अनुदानासाठी (सन
2021-2022) धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थी बहुल शासनमान्य खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळांनी परिपूर्ण प्रस्ताव मुदतीत
प्रस्ताव सादर करावेत.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.