इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०२२

व्हॅक्सीनेशन ऑन व्हील कार्यक्रमास नागरिकांनी प्रतिसाद दयावा

 


                      कोल्हापूर, दि. 8 (जिमाका):  जिल्हा  परिषद व स्वदेश फौंडेशन   मुंबई  यांच्या  वतीने ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ कार्यक्रम आजरा, चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी  तालुक्यासाठी सुरू करण्यात आल आहे. स्वदेश फौंडेशनच्या ॲम्ब्युलन्सला हिरवा झेंडा दाखवून व्हॅक्सिनेशन ऑन व्हील’ कार्यक्रमासाठी  पाठविण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी कळविले.

या प्रसंगी आरोग्य व बांधकाम समिती सभापती वंदना जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुख देसाई, सहा. जिल्हा आरोग्य अधिकारी  डॉ उत्तम मदने आदी उपस्थित होते.

            लसीकरण कार्यक्रम सर्वसमावेशक होण्यासाठी समाजातील सर्व घटकांचा सहभाग अत्यंत गरजेचा आहे. यासाठी  नागरिक, सर्व शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था यांचा कोविड लसीकरणासाठी सहभाग घेणे आवश्यक आहे. आजरा, चंदगड, पन्हाळा आणि शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम क्षेत्र, कमी लसीकरण असलेल्या  भागात, बाजपेठेचा भाग, मोठी गावे या ठिकाणी ही ॲम्ब्युलन्स जाणार आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.