इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

बुधवार, १६ फेब्रुवारी, २०२२

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प उपक्रमासाठी 31 मार्चपर्यंत अर्ज करावेत

 


 

कोल्हापूर, दि. 16 (जिमाका):  बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत समुदाय आधारित संस्थांकडून मूल्य साखळी विकासाचे उपक्रम राबविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुकांनी दि. 31 मार्चपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन आत्माचे प्रकल्प संचालक ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

          अर्ज शेतमाल, शेळ्या (मांस व दूध) आणि परसबागेतील कुक्कुटपालन (अंडी) यांच्या मुल्यसाखळी विकासाच्या उपक्रमांसाठी आहेत. अर्ज सादर करण्यासाठी पात्र समुदाय आधारित संस्थांमध्ये शेतकरी उत्पादक कंपनी आणि त्यांचे फेडरेशन्स, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापित प्रभाग संघ, महिला आर्थिक विकास महामंडळाद्वारे स्थापित लोकसंचालित साधन केंद्र यांचा समावेश आहे.

          जाहिरात संदर्भातील माहिती, अर्ज सादर करण्यासाठी पात्रतेचे निकष, अर्जाचा नमुना इ. माहिती http://www.smart.mh.org या संकेतस्थळावर Call for proposal या टॅबवर उपलब्ध आहे. त्यामध्ये माहिती भरून व आवश्यक कागदपत्रे सोबत जोडून शेतकरी उत्पादक कंपन्यांनी जिल्ह्याच्या प्रकल्प संचालक, आत्मा कार्यालय, लोकसंचलित साधन केंद्रांनी जिल्हा समन्वयक अधिकारी माविम आणि प्रभाग संघांनी जिल्हा अभियान व्यवस्थापक, एमएसआरएलएम यांच्या कार्यालयात ऑफलाईन सादर करावेत. या अगोदर ऑनलाईन अर्ज केलेल्या संस्थांनी पुनश्च: अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.