इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

क्षयरोग जनजागृतीपर बोर्ड व सरकते संदेशचे जिल्हाधिकारी कार्यालयात उद्घाटन

 


कोल्हापूर, दि. 15 (जिमाका): सर्वसामान्य लोकांमध्ये क्षयरोगविषीयी जनजागृती करणे व क्षयरोगाची लक्षणे, उपचार, टी.बी. विषयक शासकीय योजना व क्षयरोग नोटिफिकेशन कायदा या विषयी नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आमदार राजेश पाटील व जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या हस्ते जनजागृतीपर बोर्ड (स्टँडी) व एल.ई.डी. सरकते संदेश यांचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी जिल्हा आरोग्य  अधिकारी डॉ. योगेश साळे, अति. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पी.एन.देवकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. यु.जी. कुंभार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुनंदा गायकवाड, उपस्थित होते.

  क्षयरोग जनजागृतीपर बोर्डवर निःशुल्क रोगनिदान व औषधोपचार माहिती, निक्षय पोषण योजनेतंर्गत क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण होईपर्यंत 500 रुपये पोषण आहारासाठी आर्थिक मदत (शासकीय व खासगी दवाखान्यातील) रुग्णाच्या खात्यात जमा करणे, क्षयरुग्णाची नोंद कार्यक्रमांतंर्गत वैद्यकीय व्यावसायिकास 500 रुपये मानधन व क्षयरुग्णाचा उपचार पूर्ण करुन घेतल्यास पुन्हा 500 रुपये मानधन, क्षयरूग्णाचा उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाच्या उपचार सहाय्यकास रुग्णामागे 1 हजार रुपये मानधन इ.  सुविधांविषयक माहिती,  तसेच रुग्णांची नोंद न केल्यास संबंधित  खासगी रुग्णालयांना व वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (1860 च्या 45) च्या कलम  माहिती 269 आणि 270 च्या अतंर्गत शिक्षा होऊ शकते. याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

00000000

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.