इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, १ फेब्रुवारी, २०२२

डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी प्रस्ताव सादर करावेत

 


  कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजनेसाठी दि. 11 फेब्रुवारी पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अल्पसंख्यांक उच्चस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी केले आहे.

मदरशांमध्ये शिकत असलेल्या विविध वयोगटातील विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पारंपारिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या विषयाचे शिक्षण देणे, मुख्य प्रवाहातील शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या इ. 9 वी,10 वी व 12 वी तील तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देणे, परिणामी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये वाढ होवून  त्यांची रोजगार क्षमता वाढून आर्थिक दर्जा सुधारण्यास मदत होईल या दृष्टिने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी पायाभूत सुविधा, ग्रंथालयासाठी अनुदान देणे व शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान देण्याची डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेचा परिपूर्ण प्रस्ताव मदरशांनी दि. 11 फेब्रुवारी पर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सादर करावेत.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.